विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पाऊस आणि कांदा प्रश्नावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. शेतकरी नाराज असताना सत्ताधारी मात्र धुळवड साजरा करत होते, असा जोरदार टोला अजित पवारांनी लगावला. नाफेडमधील कांदा खरेदीवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्याला तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे.